सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतिक्षित संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. ब. बँकेच्या १९ संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, सोमवारी (दि.२६ ऑक्टोबर) पासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे..राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंचच्या निर्देशानुसार हा निवडणूक.