छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात पुनर्विकासाचे काम सुरू असताना गुरुवारी रात्री बुकिंग हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ छताच्या सीलिंगचा भाग कोसळला. मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात पुनर्विकासाचे काम सुरू असताना गुरुवारी रात्री बुकिंग हॉलच्या प्रवेशद्वाराजवळ छताच्या सीलिंगचा भाग कोसळला. रात्री १०:०५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.