दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमातही आत्मघाती हल्ल्याचा ई-मेल; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू. मुंबई/ नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे घर, शाळा, मुंबई महानगरपालिका कार्यालय आणि गायक दिलजीत दोसांझ यांच्या आगामी कार्यक्रमाला लक्ष्य करण्याची धमकी देणारा ई-मेल शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिका कार्यालयाला प्राप्त झाला. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.