सातारा : सातारा जिल्ह्यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ६६.९२ तर शिक्षक मतदारसंघासाठी ८९.३९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवल्य. या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी मतपेट्या बालेवाडीकडे (पुणे) बंदोबस्तात रवाना झाल्या..विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.