सातारा : जिल्हा परिषदेचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने डिजिटल प्रणालीचा अ. जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पेन्शन प्रदान करणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद म्हणून सातारा जिल्हा परिषदेने नवा आदर्श निर्माण केला आहे..जिल्हा परिषदेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन वितरण प्रक्रियेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. महाआयटीच्या प्रणालीद्वारे कोषागारामार्फत निवृत्तीवेतन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची सुविधा सुरू झाली आहे.