कुडाळ : कुडाळ शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार व. कुडाळ : कुडाळ शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वादळी वारे आणि विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांमध्ये भीतीने काहीसा थरकाप उडाला. कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर पिंगुळी म्हापसेकर तिठा नजिक सुरूचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली.