ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळपासून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. येथील ईश्वरपूर हायस्कूल आणि आदर्श. येथील ईश्वरपूर हायस्कूल आणि आदर्श हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदारांनी गर्दी केली होती. भाजप नेते विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदवीधर मतदारांनी भगवे फेटे परिधान करून येऊन उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा हक्क बजावला..