टी-20 क्रिकेटमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना रोखणारा अक्षर पटेल सध्या संघर्ष करताना दिसतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 4 षटकांत 51 धावा दिल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलची गोलंदाजी महाग ठरली. टी-20 क्रिकेटमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे ही अक्षरची ताकद मानली जाते. मात्र, अलीकडच्या सामन्यांत त्याच्या गोलंदाजीतील अचूकता आणि वेगावरील नियंत्रण कमी झाल्याचे दिसत आहे. विश्वचषकानंतरच्या 17 टी-20 सामन्यांत अक्षरने प्रति षटक सरासरी 9.1 धावा दिल्या आहेत.