बल्गेरियात अपार्टमेंट खोदकामात 1750 वर्षांपूर्वीच्या रोमन मुलाची कबर सापडली. सोन्याचे डुल आणि 274-275 ईसवी सनाचं एक दुर्मिळ कांस्य नाणंही मिळालं. प्राचीन रोमन परंपरेनुसार, हे नाणं मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी नावाडी कॅरॉनला द्यायचं. बुलगारियामध्ये काळ्या समुद्राच्या जवळ आर्कियोलॉजिस्टसना रोमन काळातील एका मुलाची कबर सापडली आहे. स्टारा जागरा शहरात एका नव्या अपार्टमेंट आणि पार्किंग प्रोजेक्टच्या सर्व्हेच्या दरम्यान ही कबर सापडली. या कबरीत कानातील सोन्याची सुंदर डुलं आणि एक छोटं ब्रॉन्जचं नाणंही सापडलं.