गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येते होते त्या पुलावर आज अनपेक्षित वाईट दुर्घटना घडली आहे. या पुलाचे काम सुरु असताना क्रेन खाली कोसळली. या घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव : खान्देशात गेल्या काही दिवसांपासून जळगाव-पाळधी या बायपास रेल्वे पुलाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. या उड्डाणपुलाचे काम प्रचंड निकृष्ट असल्याचा आरोप याआधीदेखील स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी या पुलाचा काही भाग खचला होता.