Nagpur Crime News : गुन्हा करण्यासाठी किंवा गुन्हा करून पसार झाल्यानंतर आपले ठावठिकाण पोलिसांना कळू नये म्हणून गुन्हेगारांनी नवीन शक्कल शोधली आहे. ते आता हॉटेलमध्ये राहण्याऐवजी घर किंवा फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे आपले बस्तान मांडत आहे. विविध ठिकाणी अशा प्रकारची अनेक उदाहरणे पुढे आल्याचे दिसून आल्याने पोलिस चक्रावले आहेत.