चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात. जिल्ह्यातील एकूण ३२ हजार २६२ मतदारांपैकी २३ हजार ४१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील ५८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली..प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यातील एकूण २० हजार ९०५ पुरुष मतदारांपैकी १५ हजार ८४२ पुरुषांनी मतदान केले. त्यामुळे पुरुष मतदारांची मतदानाची टक्केवारी ७५.७८ इतकी राहिली.