PMC Employees Sanugrah Anudan Approvedपनवेल : पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि विविध योजनांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. दिव. दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांसह शिक्षक, आशा वर्कर्स आणि विविध योजनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सणापूर्वी आर्थिक दिलासा मिळणार आहे..महापालिकेच्या आस्थापनेवरील ८३७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी संबंधित प्रस्तावाला महासभेने हिरवा कंदील दाखवला आहे.