ल्हासा; वृत्तसंस्था : तिबेटमध्ये गुरुवारी रात्री ७.० तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीत १६ जणांचा मृत्यू झाला असून, ६५ जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर संभाव्य धोका लक्षात घेऊन १२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रभावित भागात बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत भूकंपानंतर ४०० हून अधिक दुय्यम धक्के अर्थात आफ्टरशॉक नोंदवण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..