नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शुक्रवारी देशातील इतर काही राज्यांमध्येदेखील विधान परिषदेच्या काही जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यात बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील विधान परिषदेच्या जागांचा समावेश होता. .या निवडणुकीत सर्वाधिक ११ जागा उत्तर प्रदेशातील आहेत. बिहारमध्ये आठ, तर कर्नाटकमध्ये चार जागांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले.