जळगाव : नशा करण्यासाठी पैसे द्या, अन्यथा परिणाम भोगा, अशा प्रकारच्या दहशतीचा प्रत्यय जळगाव शहरालगतच्या खेडी गावाजवळ घडलेल्या हल्ल्याच्या घटनेतून समोर आला आहे. प. पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या रागातून तीन ते चार जणांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत किशोर मधुकर बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत..