Baramati News: बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला आहे. पुणे : बारामतीतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Baramati Video) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुणे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होत असून, यामध्ये बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षांचे पती योगेश नाळे हे पैसे मोजत आणि वाटत असल्याचा आरोप केला जात आहे.