Satara Crime news: महाविद्यालयीन युवतीने वसतीगृहातच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Satara Crime news: साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पूजा माने असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती खटाव तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी होती. पूजाने वसतीगृहात गळफास घेऊन जीवन का संपवलं याचा तपास सुरू आहे. पूजाच्या आत्महत्या केल्यामागील कारणाचा तपास सुरू असून पोलिसांच्या दप्तरी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.