Manoj Jarange On Ramdas Kadam: तूच बाटली पिऊन बघ, कशाची बाटली आहे तुला कळेलं. तुझ्याकडेच बार आहेत, तुला त्याची चव कळते, एकेरी भाषेत बोलत जरांगेंनी रामदास कदमांना डिवचलं आहे. जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी काल एक क्लिप ऐकवून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदेंनी जरांगेंना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख आहे. शिंदे गटाने या क्लिपची चौकशी करण्याची मागणी केली आहे.