Navi Mumbai Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! नेरुळमध्ये बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर प्रियकराचा चाकूने प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवी मुंबई : नवी मुंबईमधून एक अत्यंत हादरवणारी आणि भयंकर घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या एका जोडप्यात वाद (Navi Mumbai Crime News) झाल्यामुळे, संतापलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला नेरुळ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.