26 किमी मायलेज अन् किंमत फक्त 4.77 लाख रुपये. दिवाळीमध्ये घरी आणा सर्वात स्वस्त आणि ऑटोमॅटिक कार. घेण्यासाठी शोरुममध्ये होतेय प्रचंड गर्दी. दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल पण बजेट मर्यादित असेल तर बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच कार चालवणाऱ्यांसाठी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कार फायदेशीर ठरू शकतात. गर्दीच्या रस्त्यांवर वारंवार गिअर बदलण्याची गरज कमी होत असल्याने ड्रायव्हिंग करणे तुलनेने सोपे होते.