मुलाला महागडा स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी एका शेतकऱ्याने पैसे जमवले होते. दुर्गापूजेच्या काळात फोन खरेदी करताना त्याच्या नशिबाने असं काही वळण घेतलं की, बस्स.. नेमकं काय घडलं? नशीबाला आपल्या जीवनामध्ये अनेकजण अनेकदा महत्त्व देतात. अनेकांचा नशीबावर विश्वास असतो तर काहींना अजिबात नसतो. पण कोणाचं नशीब फळफळलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय येणारी एक घटना आता समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील एका शेतकऱ्याने मुलासाठी महागडा स्मार्टफोन खरेदी केला.