सनी लिओनीच्या कार कलेक्शनमध्ये नव्या लग्झरी SUVची भर. ‘ममाज बीस्ट’ म्हणत शेअर केला नवीन कारचा व्हिडीओ. भारतात या कारची किंमत 72.30 लाख रुपये. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका दमदार लग्झरी SUVची भर पडली आहे. सनी लिओनीने अमेरिकेतील टेक्सास येथे ऑफ-रोडिंगसाठी प्रसिद्ध असलेली Jeep Wrangler Rubicon ही SUV खरेदी केली आहे.