दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजनाव्ही. बी. जी. रामजी योजनेंतर्गत ७२ हजार कामे, मनरेगाची ४८. रामजी योजनेंतर्गत ७२ हजार कामे, मनरेगाची ४८ हजार अपूर्ण कामेही सुरू राहणार. जळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजना, जलसंधारण तसेच चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.