अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Solapur News: तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून, 6 जण जखमी झाले आहेत. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील नळदुर्ग बायपासजवळ ही घटना घडली. अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.