सह्याद्री एक्सप्रेस आता कायमस्वरूपी धावणार; पुणे-कोल्हापूर प्रवाशांना दिलासा Breaking Tarun Bharat. यापूर्वी विशेष गाडी म्हणून धावणारी ही एक्सप्रेस आता 11419 (पुणे-कोल्हापूर) आणि 11420 (कोल्हापूर-पुणे) या नियमित क्रमांकांनी ओळखली जाणार आहे. या निर्णयामुळे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त दोन्ही शहरांदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी सह्याद्री एक्सप्रेसला 18 आधुनिक एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.