नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना महापालिकेने दणका दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. . -अजित मांडके, ठाणेनवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत ठाणे महापालिकेने मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.