Warora Graduate Votingचंद्रपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वरोरा शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या असून, युवकांच्या सहभागामुळे मतदान केंद्रांवरील वातावरण लक्षवेधी ठरले..या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यासह उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होत असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे..