Madhuri Dixit Mimics Namrata Sambherao Lolly: सोनी मराठीवरील (Sony Marathi) 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या सहज सुंदर शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रश्नांची उत्तरं आणि खेळादरम्यान, स्पर्धक आणि सेलिब्रेटी पाहुण्यांशी होणाऱ्या तिच्या दिलखुलास गप्पांमुळे प्रेक्षकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक देखील पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्रत्येक भाग अधिकच खास होतो आहे.