Chandrakant Patil on Pune Graduate and Teachers Constituency Election 2026: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. चंद्रकांत पाटील यांचं रिझल्टबाबत भाष्य. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (Chandrakant Patil) यांनी सकाळच्या टप्प्यात कोल्हापुरातील मतदान केंद्राबाहेरील बुथना भेटी दिल्या यावेळेस त्यांनी मतदानसाठी आलेल्या मतदारांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळेस प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.