असा आरोप होता की, मनीष गर्ग यांनी निवडणूक आयोग किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाच्या वाटपात बदल करण्याचा आदेश जारी केला होता. Election Commission: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजासंदर्भातील एका वादाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त मनीष गर्ग यांच्या विरोधात कॅबिनेट सचिवालयात तक्रार दाखल केली होती. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.