Mehboob Shaikh attack on Election Commission: राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या ट्वीटने खळबळ उडाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रियेतील हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून शेख यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. Mehboob Shaikh attack on Election Commission: आज पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर तर पुणे आणि अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अनेक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.