घटस्फोटाच्या काळात या काळात धनश्रीला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून विविध दावे करण्यात आले. मात्र, तिने आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पूर्वाश्रमीची पत्नी आणि प्रसिद्ध डान्सर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली असून, एका व्हायरल फोटोमुळे ती नव्या नात्यात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.