हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यावर भर दिला जातो. चिया सीड्स आणि जवसाच्या बिया या दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. मात्र, हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोघांपैकी कोणते अधिक उपयुक्त आहे आणि त्यांचे नेमके फायदे काय आहेत, जाणून घेऊया. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याकडे अनेक जण लक्ष देतात.