मनोज जरांगे पाटील यांच्या 500 कोटींच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यातच आता पुन्हा जरांगे यांनी मोठे विधान केले. त्यांनी सखोल चाैकशी या प्रकरणाची झाली पाहिजे, असे विधान केले. मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाकडून एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी रूपये मला देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर थेट त्यांनी या संदर्भातील ऑडिओ क्लिपच मीडिया ऐकून दाखवली. या क्लिपमध्ये थेट 500 कोटींचा उल्लेख करण्यात आला.