Sujat Ambekdar : शरद पवार गटाने नितेश कराळे यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. नितेश कराळे यांच्यावरील कारवाईवर सुजात आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाच्या काही तासांआधीच शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांची शरद पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली. शरद पवार गटाने मास्तर नितेश कराळे यांची तब्बल सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली.