Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं. शेवटच्या षटकात आठ धावा वाचवताना जोश टंगने पहिल्या चार चेंडूंमध्ये दोन धावा दिल्या आणि दोन बळी घेतले. मात्र, स्ट्राईक मिळताच लियानागेने षटकार मारून श्रीलंकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.