थलपती विजयला मोठी टक्कर? सुपरस्टार अभिनेता करणार राजकारणात एन्ट्री; तामिळनाडूत मोठा उलटफेर. थलपती विजय यांच्या राजकीय यशानंतर इतर अभिनेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. आता सुपरस्टार धनुष लवकरच राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धनुषची फॅन असोसिएशन सक्रिय झाल्याने ही शक्यता बळावली आहे. धनुषच्या प्रवेशाने मुख्यमंत्री विजय यांना मोठी टक्कर मिळण्याची शक्यता असून, तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.