तापाने फणफणत होती श्रीदेवी, रात्रभर एकाच… अशा अवस्थेत शूट झालं 90 च्या दशकातील सर्वात बोल्ड गाणं. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. त्यांच्या अभिनयाची जादू आजही चाहत्यांच्या मनात तशीच कायम आहे. नुकतेच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रीदेवींच्या जयंतीनिमित्त माध्यमांसोबत खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही खास किस्से सांगितले.