अमेरिकेतही ‘लाडकी बहीण’? निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांची मोठी घोषणा. अमेरिकेत मध्यावधी निवडणुका जवळ असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांच्या आरोग्यासाठी विशेष डिव्हिजन आणि टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. मेलानिया ट्रम्प यांच्या पाठबळाने सुरू झालेल्या या योजनेत महिलांच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प सरकारची एक महत्त्वपूर्ण राजकीय रणनीती मानली जात आहे.