The first box of Devgad Hapus left for Pune देवगड : पुढारी वृत्तसेवा कोकणचा राजा आणि जगभरात अस्सल चव, मोहक सुगंध व दर्जेदार गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याने यंदाच्या हंगामाची शुभ सुरुवात केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय मुहूर्तावर देवगड येथील वीरेंद्र दत्तात्रय कांबळी तसेच कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम तर्फे यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या पुणे बाजारपेठेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.