चंद्रपूर : वरोरा येथील तालुका क्रीडांगणावर आयोजित करण्यात येणाऱ्या कल्पतरू व्यावसायिक मेळाव्याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. क्रीडांगणाचा वापर व्यावसायिक कारणा. क्रीडांगणाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करण्यास विरोध दर्शवत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा पाठिंबा मिळत आहे. .शिवसेनेचे मनिष जेठाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख मुकेश जीवतोडे, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समर्थन दिले.