सिएटलमध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या भारतीयांच्या कार्यक्रमात एक ट्रम्प समर्थक पोहोचला. त्याने. Trump Supporters Anti Hindu Slogans: अमेरिकेत हिंदू समाजाविरुद्ध द्वेषपूर्ण कृत्याची एक घटना समोर आली आहे. सिएटलमध्ये दिवाळी साजरी करणाऱ्या भारतीयांच्या एका कार्यक्रमात एक ट्रम्प समर्थक पोहोचला. त्याने "सर्व भारतीयांना देशातून हाकलून द्या" आणि "हिंदू ख्रिश्चनांची जागा घेत आहेत" असे लिहिलेले फलक हातात धरले होते. मध्यवर्ती निवडणुकीमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवामागे भारतीय होते, असा आरोप ट्रम्प समर्थकांनी केला आहे.