#Satara #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics सातारा:माण तालुक्यातील पिंपरी येथे थेट बांधावर बसून पालकमंत्री शंभूराज देसाईंची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी; ५ हजारांची रक्कम केवळ 'अग्रीम' मदत असल्याचा केला खुलासा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी माण तालुक्यातील पिंपरी येथे जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांच्या समवेत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बसून फराळाचा आस्वाद घेतला आणि सामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.