जळगाव लाईव्ह न्यूज । दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त. याच उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील बंजारा समाजबहुल पोखरी तांडा येथे ग्रामस्थांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी राज्यातील मंत्री ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आहेत.