गाडी क्रमांक ०१२२६ भुसावळ-देवळाली विशेष मेमू १० आणि ११ नोव्हेंबर रोजी भुसावळहून सकाळी ९.१५ वाजता सुटणार असून दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचणार आहे. दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त रेल्वेने भुसावळ ते देवळालीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे जळगावसह खान्देशातील प्रवाशांना नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.