घोडेगाव, ता. ८ ः शेती आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी पक्के रस्ते आवश्यक आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांना शेतरस्ते हवे आहेत, त्यांनी तहसील कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मागणी अर्ज सादर करावेत. पुढील बैठकीत या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल, असे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात बैठक झाली.