Chiplun Stray Animals Issue मुळे चिपळूण शहरातील विविध भागांसह पाग परिसरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिक तीव्र त्रस्त. या समस्येचा सर्वाधिक त्रास शालेय विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने पाग परिसरातील महिलांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव व उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांची भेट घेऊन तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.