जवसाच्या देठांपासून धागानिर्मितीचा मार्ग मोकळा.तीन जिल्ह्यांत १५० एकरांवर ‘शारदा’ वाणाची लागवड.ॲग्रोवन वृत्तसेवानागपूर : जवसाच्या देठांपासून धागानिर्मिती करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘शारदा’ वाणाची यंदा रब्बी हंगामात प्रायोगिक लागवड करण्यात येत आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मिळून १५० एकरांवर हे पीक घेतले जाणार आहे.जवसाच्या देठांपासून धागा निर्मिती करण्याच्या उद्देशाने कृषी विद्यापीठाने ‘शारदा’ हे वाण विकसित केले आहे. या वाणाची अधिसूचना मागील वर्षभरापासून प्रलंबित होती.