सभासदांचा विश्वास हीच व्यापारी पतसंस्थेची खरी ताकदउत्तम डाके ः सभासद प्रशिक्षण उत्साहातबेलवंडी, ता. ७ ः सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांनी संस्थेवर दाखवलेला विश्वास हीच व्यापारी पतसंस्थेची खरी ताकद आहे. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने सभासदांचे हित जोपासण्याला प्राधान्य दिले असून, पारदर्शक कारभार आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर संस्थेची प्रगती सुरू आहे. सर्वांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास आम्ही सातत्याने सार्थ ठरवू, असे प्रतिपादन व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तम डाके यांनी केले..